शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पेरूच्या पहिल्या तोड्यातच ७० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:23 IST

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. बागुल बंधूंनी योग्य नियोजन करून लखनौ जिविलास या जातीच्या पेरू बागेची लागवड केली. पहिल्याच तोड्याला सुमारे ६०० ते ७५० ग्रॅम वजनाचे फळ तयार झाले असून, त्यांना पहिल्याच तोड्यात सुमारे साठ ते सत्तर हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्येक हंगामानुसार उत्पन्न वाढत असून, वर्षाकाठी सुमारे पाच ते सहा लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बागुल यांनी पेरूबागेत हरभºयाचे आंतरपीक घेऊन त्यातूनही सुमारे ५ क्विंटल उत्पन्न घेतले. त्यांच्या पेरूबागेस तालुक्यातील शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत.  बागुल यांची सुमारे दोन एकर द्राक्षबाग आहे. त्याचे योग्य नियोजन केल्याने ही बागही त्यांना भरघोस उत्पन्न देत आहे. त्यातूनच प्रेरणा घेत बागुल यांनी पेरूबाग फुलवण्याचा विचार केला. पेरूबाग लावण्या-संदर्भात त्यांनी माहिती घेऊन नियोजन केले. पेरूबाग लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाचा खर्च आला.  लखनौ येथून जिविलास जातीची सुमारे १०५० रोपे आणून जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली. दोन ओळींमध्ये सुमारे साडेआठ फुटांचे, तर दोन झाडांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवून रोपांची लागवड केली. बागेची लागवड करण्यापूर्वी बागुल यांनी शेताची नांगरणी करून बेड तयार केले. त्या बेडवर सुमारे एक ते दीड फुटाचे खड्डे घेऊन त्यात शेणखत, १०-२६-२६, पोट्याश, सुपर फोस्फेट, थायमेट आदींचे योग्य प्रमाण करून खड्ड्यात टाकले. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय करून रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना सुमारे एक  लाख रुपयांचा खर्च आला.  लागवड केल्यानंतर सुमारे सहा महिने झाडांवर फुलकळी ठेवली नाही. रोप कमरेबरोबर आल्यावर त्याचा शेंडा खुडून घेतला व नंतर  येणाºया कळ्यांमधून पेरूचे उत्पादन घेतले. यात पहिल्याच तोड्यातून सुमारे ७० ते ७५ क्रेट उत्पादन निघाले. त्यास सरासरी ६० ते ७० रु पये प्रतिकिलो भाव मिळाला. परिसरातील आठवडे बाजारात पेरुची विक्री केली. शेंडे ेखुडल्याने मोठ्या प्रमाणात फुलकळी येत असून, त्यामुळे वर्षभर बागेत पेरू उपलब्ध होणार आहे. आता दुसºयांदा झाडांची छाटणी केली असून, फळ सेट होत आहे. सध्या एका झाडास सरासरी ३० ते ५० पर्यंत फळे लागली आहेत. यातील काही फळांची छाटणी करून योग्य फळच झाडावर ठेवावे लागणार आहे. फळे लागल्यामुळे बागेला सुमारे तीनवेळा औषध फवारण्या कराव्या लागणार आहेत.  फळ वाढीसाठी प्रोफेक्स २५ मिली प्रत्येकी २०० लिटर पाण्याचे प्रमाण घेऊन फवारणी केली. इजिस्टीम २५० मिली प्रति २०० लिटर पाण्यातून दिले जाते. तसेच ०५२ .३४ २५ किलो जमिनीतून झिंक बोरॉन १०० ग्राम २०० लिटर पाण्यातून दिले जाते. झाडांवर मिलीबग व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून न्युओन प्रोफेक्स बायोस्टीमची फवारणी केली जात आहे. निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे शेतकºयांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक बदल करीत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. पेरूबागेसाठी मनुष्यबळ तसेच खर्चही कमी येत असून, त्यातून नफा जास्त मिळत आहे. शेतकरी वर्गाने बाजारपेठेत मालाची गरज ओळखून पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. फळबागांची लागवड करणे योग्य ठरणार आहे.- भाऊसाहेब बागुल, पेरू उत्पादक शेतकरी, पाटोदा

 

टॅग्स :Farmerशेतकरी