नाशिक केंद्रातून ‘विसर्जन’ ठरले प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:38 AM2018-12-11T01:38:11+5:302018-12-11T01:38:26+5:30

राज्य नाट्य स्पर्धा  नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, ...

 First to be 'immersed' from Nashik center | नाशिक केंद्रातून ‘विसर्जन’ ठरले प्रथम

नाशिक केंद्रातून ‘विसर्जन’ ठरले प्रथम

Next

राज्य नाट्य स्पर्धा 

नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक या संस्थेच्या ‘विसर्जन’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाला आहे. तसेच संस्कृती, नाशिक या संस्थेचे ‘तिरथ में तो सब पानी है’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- एस. एम. रिसर्च अ‍ॅण्ड एज्यु. फाउंडेशन, नाशिक या संस्थेच्या नागमंडल या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक सचिन शिंदे (नाटक-विसर्जन), द्वितीय पारितोषिक रोहित पगारे (नाटक- नागमंडल), प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक राहुल गायकवाड (नाटक- विसर्जन), द्वितीय पारितोषिक रवि रहाणे (नाटक- नागमंडल), नेपथ्य : प्रथम पारितोषिक लक्ष्मण कोकणे (नाटक- विजर्सन), द्वितीय पारितोषिक गणेश सोनवणे (नाटक- तिरथ में तो सब पानी है...), रंगभूषा : प्रथम पारितोषिक माणिक कानडे (नाटक- विसर्जन), द्वितीय पारितोषिक अनिल कडवे (नाटक- आधार शीला), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक धनंजय गोसावी (नाटक- विसर्जन) व दीप्ती चंद्रात्रे (नाटक- विसर्जन) यांना देण्यात आले.
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : पूनम देशमुख (नाटक- देहासक्त), गायत्री पवार (नाटक- ऋतू आठवणींचे), गीतांजली घोरपडे (नाटक-कळसूत्री), स्नेहा ओक (नाटक- आधारशिला), प्राज्ञी मोराणकर (नाटक- डोंगरार्त). प्रशांत हिरे (नाटक- तिरथ में तो सब पानी है...), कुंतक गायधनी (नाटक- सूर्याची पिल्ले), राहुल बर्वे (नाटक- नागमंडल), राजेंद्र जव्हेरी (नाटक व्हइल ते दणक्यात), अजय तारगे (नाटक- अखेरचं बेट).
४दि. १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मानसी राणे, दीप चहांदे आणि राम ढुमणे यांनी काम पाहिले.
अंतिम फेरीसाठी निवड
‘विसर्जन’ व ‘तिरथ में तो सब पानी है’ या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

दि. १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

Web Title:  First to be 'immersed' from Nashik center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.