शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

पिस्तुलने गोळीबार : साडेतीन लाख रूपयांची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:42 IST

नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ...

ठळक मुद्दे हल्लेखोर दुचाकीवर बसून फरार ‘एअर गन’चा धाक दाखवून लूट केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात घडली घटना

नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी पिस्तुलने गोळीबार करत व्यापाऱ्याची जबरी लूट केल्याची घटना घडली. व्यावसायिकाच्या हातातील साडेतीन ते पावणेचार लाख रूपयांची रोकडची बॅग हल्लेखोरांनी शनिवारी (दि.३०) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास लांबविली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साधुवासवानी रस्त्यावरील कुलकर्णी गजानन स्मृती अपार्टमेंटच्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे विराग चंद्रकांत शाह (३८) हे गोळे कॉलनीमधील त्यांच्या पुनम एन्टरप्रायजेस या होलसेल वैद्यकिय साहित्य विक्रीचे दुकान आटोपून दुचाकीवरून घरी आले. यावेळी त्यांचा पाठलाग करत एका स्पोर्टसबाईकवरून तीघे युवक आपर्टमेंटच्या वाहनतळापर्यंत आले. त्यावेळी तीघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल (एअर गन) रोखून फायर केले. यामुळे शाह घाबरून वाहनतळातून जिन्याकडे पळताना पडले. त्यांच्या हातातून दोघा हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावून तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. यावेळी ज्याच्या हातात पिस्तुल होते तो वाहनतळातून चालत बाहेर आला. यावेळी समोरील बंगल्यावरील वॉचमन सुभाष कारगोडे हे घराबाहेर धावत आल्याने त्याने त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून दम भरला यामुळे सुभाष यांनी घाबरून बंगल्यातील मोटारीमागे लपले. त्यावेळी तीसरा हल्लेखोर दोघा साथीदारांच्या सोबत दुचाकीवर बसून फरार झाला.या घटनेनंतर विराग यांनी तत्काळ घरी जाऊन सर्व प्रकार सांगत पोलीस नियंत्रण क क्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे, सोमनाथ तांबे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहनतळाचा संपुर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला; मात्र रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे गावठी कट्टयाने झालेल्या गोळीबाराचे कुठलेही पुरावे वाहनतळाच्या परिसरात आढळून आले नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी ‘एअर गन’चा धाक दाखवून आवाज करत जबरी लूट केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Firingगोळीबारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडा