फटाके विक्रीच्या जागेचे लिलाव
By Admin | Updated: October 6, 2014 00:12 IST2014-10-05T01:17:47+5:302014-10-06T00:12:15+5:30
फटाके विक्रीच्या जागेचे लिलाव

फटाके विक्रीच्या जागेचे लिलाव
नाशिक : महापालिकेच्या वतीने दिवाळीनिमित्ताने फटाके विक्रीच्या जागेचे लिलाव करण्यात येतात; परंतु यंदा हे लिलावही विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात अडकले आहेत. यासंदर्भात महापालिकेने निवडणूक आयोगाला थेट प्रस्ताव पाठविला होता. परंतु शासनातर्फे हा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना महापालिकेला करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या वतीने दरवर्षी फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या जातात. या जागांवर १८० गाळे उभारले जातात आणि पालिकेला भाड्यापोटी रक्कम मिळते. यंदाही गोल्फ क्लब मैदान (ईदगाह) येथे गाळे उभारण्याची महापालिकेची तयारी असून, अन्य पारंपरिक जागांवरही गाळे उभारता येणार आहेत. त्यासाठी पालिकेला लिलाव करायचे आहेत.