अग्निशामकच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
By Admin | Updated: July 29, 2016 00:08 IST2016-07-29T00:04:21+5:302016-07-29T00:08:08+5:30
ना हरकत दाखल्यासाठी घेतली लाच

अग्निशामकच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
नाशिक : शिंगाडातलाव येथील वीर बापू गायधनी अग्निशामक मुख्यालयात लाचखोर कें द्र अधिकारी राजेंद्र मुकुंदराव बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी (दि.२८) रंगेहाथ पकडले. पंधरवड्यात महापालिकेचा दुसरा कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, इंदिरानगर परिसरातील सुचितानगरमध्ये एका डॉक्टरचे प्रसूती रुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंबईच्या एका खासगी कंपनीचे कामगार महादेव लक्ष्मण करलकर (रा. विक्रोळी) यांनी नवीन अग्निशमन प्रतिरोधक यंत्रणा बसविली आहे. या यंत्रणेची काही दिवसांपूर्वी बैरागी यांनी जाऊ न पाहणी केली होती.