येवला तालुक्यात चाऱ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:04 IST2018-10-19T19:04:01+5:302018-10-19T19:04:18+5:30
येवला : दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे ५५हजार रु पये किंमतीच वाळलेला चारा विकत घेऊन मातुलठाण कडून राजापूर कडे जात असताना शोर्ट सिर्कट मुळे हा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.

आगीच्या भक्षस्थानी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला वाळलेल्या चाº्याचा ट्रॅक्टर
येवला :
दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे ५५हजार रु पये किंमतीच वाळलेला चारा विकत घेऊन मातुलठाण कडून राजापूर कडे जात असताना शोर्ट सिर्कट मुळे हा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.
येवला तालुक्यातील राजापूर येथील सुभाष उगले यांनी भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन मातुलठाण येथून सुमारे ५५ हजार रु पये किंमतीचा दोन ट्रॅक्टर वाळलेला चारा विकत घेऊन जनावरांसाठी राजापूर कडे घेऊन जात असताना दरम्यान नगरसूल मातुलठाण रस्त्यावर ३.४५ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवर उंच बांधलेला चारा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने चार्याला अचानक आग लागली. आग लागल्याने तत्काळ येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीचे स्वरु प भिषण असल्याने आगीने रौद्र रु प धारण केले होते त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी घडली नसली तरी देखील या मुळे एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन दलाचे अधिकारी तुषार लोणारी, फायरमन कृष्णा गुंजाळ, नंदू शिंदे, नितीन कुºहे यांचेसह परीसरातील शेतकºयांनी शिताफीने ही आग विझवली. दरम्यान बाभूळगाव येथे देखील अशीच घटना घडल्याची माहिती आहे.