पंचवटी : येथील कपालेश्वर मंदिराजवळील पाराशरे वाड्यास रविवारी (दि़ ८) सायंकाळच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये सुमारे एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़ दरम्यान, या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील कपालेश्वर मंदिराजवळील अंबिका चौकात अनिल पाराशरे यांचा सुमारे ९० वर्षांपूर्वीचा तीन मजली लाकडी वाडा आहे़ तिसऱ्या मजल्यावर राहणारे पाराशरे यांनी सायंकाळी देवासमोर दिवा लावला होता़ सायंकाळी अचानक काम निघाल्याने ते बाहेर गेले असता घराला आगलागली़
पंचवटीतील पाराशरे वाड्याला आग कपालेश्वर जवळील घटना : आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:16 IST