नाशिक रोडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:13 IST2021-05-10T04:13:58+5:302021-05-10T04:13:58+5:30
मुक्तिधाम समोरील जामा मस्जिद जवळ व्यावसायिक संकुल असलेली आनंद बाजार इमारत आहे. या इमारतीच्या मध्यभागी गच्चीवर फायबर पत्र्याचे शेड ...

नाशिक रोडला आग
मुक्तिधाम समोरील जामा मस्जिद जवळ व्यावसायिक संकुल असलेली आनंद बाजार इमारत आहे. या इमारतीच्या मध्यभागी गच्चीवर फायबर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फायबर शेडच्या पत्र्यांना कशाने तरी आग लागून आकाशात काळ्या धुराचे लोट पसरू लागले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित नाशिक रोड अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन चौथ्या मजल्यावरील फायबरच्या पत्र्याच्या शेडला लागलेली आग त्वरित विझवली. नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जमलेली गर्दी पांगवली. फायबरच्या शेडला लागलेली आग त्वरित विझविल्याने पुढील अनर्थ टळला. (फोटो ०९ आग)