भोर टाऊनशिपमधील घराला आग
By Admin | Updated: November 12, 2014 00:55 IST2014-11-12T00:55:09+5:302014-11-12T00:55:43+5:30
भोर टाऊनशिपमधील घराला आग

भोर टाऊनशिपमधील घराला आग
सातपूर : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भोर टाऊनशिपमधील एका घरास गॅस सिलिंडर गळतीमुळे आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला़ सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही़ चुंचाळे येथील भोर विद्यालयाजवळील रहिवासी पांडुरंग तुळशीराम सूर्यवंशी यांच्या घराला गॅस गळतीमुळे आग लागली़ या आगीत सूर्यवंशी यांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ या आगीची माहिती तत्काळ सातपूर अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यानंतर राजेंद्र मोरे, मुकुंद सोनवणे, विजय मुसळे, सुभाष जाधव, हर्षद पटेल, रवि भोये आदि जवानांनी ही आग आटोक्यात आणली़ रात्री अकरा वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते़ (वार्ताहर)