देवळे येथे घराला आग

By Admin | Updated: June 2, 2015 00:15 IST2015-06-01T22:49:37+5:302015-06-02T00:15:19+5:30

देवळे येथे घराला आग

Fire in the house at Devale | देवळे येथे घराला आग

देवळे येथे घराला आग

इगतपुरी : तालुक्यातील मौजे देवळे येथील रहिवासी मधुकर गजीराम तोकडे यांच्या घराला रविवारी अचानक मोठी आग लागून त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आगरी सेनेच्या वतीने इगतपुरीचे प्रभारी तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मधुकर तोकडे यांच्या घराला लागलेल्या आकस्मिक आगीत त्यांचे संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे आदिंसह लाखो रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले. या आगीने त्यांचा हक्काचा निवारा हिरावला गेला असून, त्यांचे सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे. घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा पंचनामा अधिकाऱ्यांनी केला आहे. या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सखाराम जोशी, युवा उपाध्यक्ष अनिल भोपे, विनोद भागडे, देवळेचे उपसरपंच दत्ता तोकडे, विठ्ठल लंगडे, आदिंच्या साक्षऱ्या आहेत.(वार्ताहर)

Web Title: Fire in the house at Devale