नांदगावी बागेतील गवतास आग
By Admin | Updated: May 9, 2017 01:36 IST2017-05-09T01:36:27+5:302017-05-09T01:36:35+5:30
नांदगाव : शहरात शनिमंदिराजवळ असलेल्या बागेतील वाळलेल्या गवताला आग लागल्याने बागेचा एक भाग जळून खाक झाला.

नांदगावी बागेतील गवतास आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : शहरात शनिमंदिराजवळ असलेल्या बागेतील वाळलेल्या गवताला आग लागल्याने बागेचा एक भाग जळून खाक झाला. यात अनेक पूर्ण वाढ झालेली व शोभेची हजारो रुपये किमतीची झाडे जळाली. अज्ञात टवाळखोराने जळती काडी वाळलेल्या गवतावर टाकल्याने आग लागल्याचे समजते. आगीच्या ज्वाळांवर तरु णांनी बादल्यांनी पाणी मारून ती विझविण्याचा प्रयत्ंन केला. दरम्यान, नगराध्यक्ष राजेश कवडे यांना हे वृत्त कळताच त्यांनी पालिकेची माणसे पाठवली.
शनिमंदिर बाग शहरातील एकमेव बाग व मनोरंजनाचे साधन असून, आबालवृद्धांची येथे दररोज गर्दी असते. नुकतीच येथे व्यायामाची साधने पालिकेने लावली आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शांतता बैठकीत उगले यांनी बंबाचा मुद्दा उपस्थित करून
मुख्याधिकारी यांना धारेवर धरले होते. शहरातील अजून किती मालमत्ता भस्मसात झाल्यानंतर बंब कार्यान्वित होईल, असा खडा सवाल केला होता. नांदगाव येथील शनिमंदिराजवळील बागेतील गवताला लागलेली आग. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती.