गॅरेजला आग; तीन दुकाने भस्मसात

By Admin | Updated: May 15, 2017 01:25 IST2017-05-15T01:24:59+5:302017-05-15T01:25:14+5:30

नाशिक : येथील सारडा सर्कल परिसरात असलेल्या दुकानांना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

Fire on garage; Consumption of three shops | गॅरेजला आग; तीन दुकाने भस्मसात

गॅरेजला आग; तीन दुकाने भस्मसात

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील सारडा सर्कल परिसरात असलेल्या दुकानांना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत एका गॅरेजसह कुशन व सलूनचे दुकान भस्मसात झाले असून, गॅरेजमधील आठ ते दहा दुचाकींचा कोळसा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप दुकानमालकांनी केला आहे.
सारडा सर्कल परिसरात विविध दुकाने असून, सकाळी ‘बाइक पॉइंट’, हिरा कुशन्स या दुकानाला लागून असलेली सलूनची टपरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महावितरणच्या विद्युत खांबावर ‘स्पार्क’ होऊन पत्र्याच्या शेडवर ठिणग्या पडल्याने कुशनच्या दुकानाने पेट घेतला.

Web Title: Fire on garage; Consumption of three shops