आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

By Admin | Updated: May 3, 2016 22:34 IST2016-05-03T22:22:23+5:302016-05-03T22:34:09+5:30

आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

Fire extinguishes seven shops; 50 lakhs losses | आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

आगीत सात दुकाने खाक; ५० लाखांचे नुकसान

 पिंपळगाव बसवंत : सुदैवाने जीवितहानी नाही; तीन तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथे आज पहाटे लागलेल्या आगीत ७ दुकाने जळाल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येथील महामार्गाला लागून असलेल्या बस आगाराजवळ दुकानांनी पहाटे ३.४५ वाजेदरम्यान आग लागली. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका गॅरेजमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमक दलाला संपर्क करून बोलविले. अग्निशमक येईपर्यंत काही क्षणात दुकानातील आतील भागांनी पेट घेतला. या आगीने रौद्र रूप धारण केले. एका अग्निशमकच्या गाडीने आग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नसल्याने ओझर व नाशिक अग्निशमक दलाला कळविण्यात आले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र यात सात दुकानांची पूर्णत: राखरांगोळी झाली. या दुकानालगतच गॅरेज आहेत. आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुकानांची हानी टळली. या आगीत सिकंदर मोहम्मद शेख यांच्या गॅरेजमधील १५ मोटरसायकली, अकील शेख यांच्या गॅरेजमधील २ मोटरसायकल, सोहील शेख नजीर यांच्या दुकानातील क्लज प्लेटा, हमीदभाई रेडिएटरवाले, प्रताप काकडे यांचे जनरल स्टोअर्स, अमित गायकवाड यांचे लॉटरीचे दुकान, जाकीर पिंजारी यांचे बॅटरी दुकान, नहीम पटेल यांचे भंगार दुकान जळून खाक झाले. जवळपास ५० लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शॉर्टसर्किट मुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Fire extinguishes seven shops; 50 lakhs losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.