रणखेडे येथे घराला आग लागून नुकसान
By Admin | Updated: December 10, 2015 22:44 IST2015-12-10T22:43:37+5:302015-12-10T22:44:45+5:30
रणखेडे येथे घराला आग लागून नुकसान

रणखेडे येथे घराला आग लागून नुकसान
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील रणखेडा येथील शेतकरी पांडुरंग केशव अहिरे यांच्या शेतातील रहात्या घरास आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी (दि. १०) सकाळी अचानक आग लागल्याने आगीत एक लाख रुपयांसह संसारोपयोगी साहित्य, धान्य व महत्त्वाचे कागदपत्र असा संपूर्ण संसार जळून नष्ट झाला असून, यात सुमारे दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. याबाबत रितसर पंचनामा तलाठी रिमा भागवत यांनी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याचे सांगितले.
अहिरे कुटुंबीय गेल्या एक महिन्यापासून ऊसतोडीच्या कामासाठी बाहेरगावी गेलेले असल्याने या अग्नितांडवात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरात वीजपुरवठा नाही. शेजारील नागरिक शेतात कामासाठी आले असता घरास मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहून सरपंच शिंदे यांना कळविण्यात आले.
या घटनेची माहिती महसूल विभागास मिळताच या भागातील तलाठी रिमा भागवत यांनी घटने ठिकाणी धाव घेऊन पाहणी करीत रितसर पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठांना दिला.