शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

पूराच्या पाण्यात रात्री अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाने केले ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:38 IST

रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३०), आणि शंकर रतन वाघ (१६) असे तिघेजण पाण्यात अडकले होते

ठळक मुद्देजवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव

नाशिक : रविवारी गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मालेगाव स्टँड उतारावरील गोदापार्कलगत असलेल्या चिंचबनजवळ सुलभ शौचालयाच्या इमारतीला पूराच्या पाण्याचा वेढा पडला होता. या इमारतीवर असलेल्या तीघांना  अग्निशमन केंद्राच्या जवानांनी धाव घेऊन सुरक्षितपणे पूराच्या पाण्यातून रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बाहेर काढले.रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३०), आणि शंकर रतन वाघ (१६) असे तिघेजण पाण्यात अडकले होते. पुराचे पाणी वाढण्यापूर्वी नागरिकांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले होते मात्र त्यानंतर पुराचे पाणी वाढत गेल्याने तिघांना पाण्याबाहेर निघण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी शौचालयावर असलेल्या खोलीत धाव घेतली व त्या ठिकाणी ते अडकून पडले.सदर घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी माजी नगरसेवक दिलीप खेडकर यांना कळविली त्यानंतर खेडकर यांनी तत्काळ अिग्नशमन दलाला तिघे जण पाण्यात अडकल्याची माहिती कळविली घटनास्थळी पंचवटी अिग्नशमन दल तसेच अिग्नशमन मुख्यालयातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात बोट उतरून चिन्मय आश्रम ते शौचालय पर्यंत शंभर मीटर पुराच्या पाण्यात नेऊन शौचालयावर अडकलेल्या शेवरे पती-पत्नी, भाचा वाघ अशा तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. परिसरात वीज पुरवठा खंडित झाला असताना बॅटरी च्या सहाय्याने बोट घटनास्थळापर्यंत नेण्यात आली यावेळी बोटीला लांबलचक दोरखंड बांधण्यात येऊन नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बोट बाहेर ओढण्यात आली. अग्निशमन दलाचे मंगेश पिंपळे, सिद्धार्थ भालेराव, विजय शिंदे, देविदास इंगळे, आर. आर. पवार, आदि कर्मचाऱ्यांनी तिघांचे प्राण वाचिवले.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgodavariगोदावरीRainपाऊस