सिन्नरमधील मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला आग
By Admin | Updated: April 2, 2017 12:34 IST2017-04-02T12:15:50+5:302017-04-02T12:34:09+5:30
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मुसळगाव एम आय डी सी मध्ये मार्कवूड कंपनीला पहाटे भीषण आग लागली

सिन्नरमधील मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला आग
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 2 - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मुसळगाव एम आय डी सी मध्ये मार्कवूड कंपनीला पहाटे भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
आज पहाटे मार्कवूड कंपनीला आग लागली, कंपनीत प्लायवूडचा साठा असल्याने आग भडकली. अग्निशमन दलाच्या 8 बंबांनी पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आली. मात्र या भीषण आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील माल जळाल्याने मोठे नुकसान झाले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.