इलेक्ट्रिक दुकानात आगीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:19+5:302021-08-13T04:18:19+5:30
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बंगल्याच्या तळ मजल्यावर दोन गाळे काढण्यात आले आहेत. एका गाळ्यात ...

इलेक्ट्रिक दुकानात आगीचा भडका
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बंगल्याच्या तळ मजल्यावर दोन गाळे काढण्यात आले आहेत. एका गाळ्यात प्रकाश कोतकर यांचे किराणा दुकान, तर दुसऱ्या गाळ्यात आशापुरी नावाचे इलेक्ट्रिकल्स साहित्य विक्रीचे दुकान असून, ते अविनाश कोतकर चालवितात. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे या दुकानात अडीच वाजण्याच्या सुमारास आशापुरी इलेक्ट्रिकल्स दुकानात शॉर्टसर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्यासह फर्निचर जळून खाक झाल्याचे दुकानमालकाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. यामुळे शेजारच्या दुकानांना निर्माण झालेला आगीचा धोका टळला. केंद्राच्या दोन बंबांच्या मदतीने जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
120821\12nsk_5_12082021_13.jpg
आगीत दुकान झाले राख