शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दल अधिकाऱ्याचा ‘स्फोटक’ कारभार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:17 IST

महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही इमारतीत बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला वेळेत मिळणे हे दुर्मीळ मानले जात असताना याच दलाच्या अधिकाºयाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड कार्यक्षमता दाखवली आणि सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या केल्या,

नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही इमारतीत बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला वेळेत मिळणे हे दुर्मीळ मानले जात असताना याच दलाच्या अधिकाºयाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड कार्यक्षमता दाखवली आणि सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या केल्या, अशी तक्रार महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाजन यांनी या प्रकाराचा इन्कार केला असून आपण जेमतेम पंधरा प्रकरणे शेवटच्या आठवड्यात मंजुर केली असतील त्याबाबत सर्व रजिस्टर महापालिकेकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  शहरात बांधण्यात येणाºया वाणिज्य इमारती तसेच मिश्र वापराची इमारत आणि विशेष करून हॉटेल्स आणि रुग्णालयांना बांधकाम परवानगीच्या वेळी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला द्यावा लागतो. असा दाखला मिळवणे हे नाशिकमध्ये अत्यंत जटिल आणि कठीण काम आहे. विशेषत: शासनाने अग्निसुरक्षा कायदा केल्यानंतर महापालिकेत सर्वच व्यावसायिकांची या परवान्यावरून कोंडी झाली. अत्यंत जटिल आणि अव्यवहार्य सूचनांमुळे नाशिकचे वैद्यकीय व्यावसायिक मेटाकुटीस आले असून, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.  अग्निशमन दलाकडील अडवणूक शहरातील व्यावसायिकांची प्रमुख समस्याच ठरली. त्यासंदर्भात महासभेत आणि शासनापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता अनिल महाजन यांनी निवृत्तीच्या अखेरच्या दिवसात सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या केल्याची तक्रार आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आली आहे. एरवी, परवानगीच मिळत नसल्याची तक्रार असणाºया या विभागाची इतकी भरीव कामगिरी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नजरेत भरली असून, त्यांनी तक्रारीच्या आधारे चौकशीचे आदेश या विभागाचे खातेप्रमुख अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिले आहेत..महापालिकेचे अग्निशमन दल अधिकारी म्हणून कामकाज करताना अनिल महाजन यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यातच रुग्णालयांना अग्निशमन सुरक्षा कायद्यात सवलतीचे एक पत्र महापालिकेला मिळाले होते. ते जाणीवपूर्वक दडविण्यात येत असल्याचा आरोप होता. सदरचे पत्र कालांतराने सापडले असले तरी हे पत्र दडवून ठेवल्याच्या प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाजन यांना एक लाख रुपयांचा दंड केला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFairजत्रा