मोहेगाव येथे चार्याच्या गंजीला आग
By Admin | Updated: May 6, 2014 22:24 IST2014-05-06T22:24:29+5:302014-05-06T22:24:29+5:30
मनमाड : येथून जवळच असलेल्या मोहेगाव येथे शेखर पाराशर यांच्या शेतातील चार्याच्या गंजीला आग लागून सुमारे २० ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे.

मोहेगाव येथे चार्याच्या गंजीला आग
मनमाड : येथून जवळच असलेल्या मोहेगाव येथे शेखर पाराशर यांच्या शेतातील चार्याच्या गंजीला आग लागून सुमारे २० ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्रस्वरूप धारण केले.आजूबाजूच्या शेतकर्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीटंचाईमुळे आग विझवण्यास पुरेशे पाणी उपलब्ध होउ शकले नाही.संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान तर झालेच पण जनावरांच्या चार्याचा प्रश्र निर्माण झाला आहे.आगीचे कारण समजू शकले नाही. मनमाड येथील अग्णीशमन दल मोहेगाव येथे घटनास्थळी पोहचलेच नसल्याचे पाराशर यांनी सांगीतले. (वार्ताहर)