अग्निशमन दलाचे संचलन : अग्निशमन सप्ताह
By Admin | Updated: April 18, 2017 22:42 IST2017-04-18T22:42:59+5:302017-04-18T22:42:59+5:30
राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस म्हणून १४ एप्रिल साजरा केला जातो. दि. १४ ते दि. २० एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो

अग्निशमन दलाचे संचलन : अग्निशमन सप्ताह
नाशिक : राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस म्हणून १४ एप्रिल साजरा केला जातो. दि. १४ ते दि. २० एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो. याअंतर्गत शहरातील अग्निशमन दलाच्या वतीने परिसरातून सजविलेल्या बंबांसह संचलन करण्यात आले.
१९४४ साली दि. १४ एप्रिल रोजी मुंबईच्या बंदरातील व्हिक्टोरिया गोदीमधील प्रथम क्रमांकाच्या धक्क्यावर असलेल्या दारूगोळ्याने भरलेल्या बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली होती. त्याठिकाणी उसळलेल्या आगीच्या आगडोंबाशी झुंज देताना प्रचंड स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांनी प्राणाची आहुती देऊन हौतात्म पत्कारले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी मुख्यालयापासून सजविलेल्या बंबांसह जवानांनी गणवेशात सारडा सर्कलपर्यंत संचलन केले.