अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 11, 2015 22:43 IST2015-11-11T22:41:44+5:302015-11-11T22:43:17+5:30
अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : भद्रकाली फ्रूट मार्केट परिसरात अनधिकृतपणे फटाके विक्री करणाऱ्या चार दुकानदारांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे़
भद्रकाली फ्रूट मार्केटमध्ये फटाके विक्री करणारे जगन्नाथ करपे, शैलेश बुराडे, मधुकर भागवत व नाना भागवत असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़
या सर्वांवर विनापरवानगी फटाके विक्री केल्याचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे़
अधिक तपास पोलीस करीत
आहेत. (प्रतिनिधी)