एक वाजताच संपली रोकड
By Admin | Updated: November 12, 2016 02:19 IST2016-11-12T01:56:53+5:302016-11-12T02:19:15+5:30
दुपारनंतर पोस्टाचे काउंटर बंद : एक कोटीच्या नोेटा बदलून दिल्या

एक वाजताच संपली रोकड
नाशिक : हजार व पाचशेच्या नोटा बदलण्यासाठी पोस्ट कार्यालयात नागरिकांनी शुक्रवारी (दि. ११) सकाळपासून गर्दी केली खरी, परंतु रक्कम दुपारी संपल्याने नागरिकांना खाली हात परतावे लागले. पोस्टात उपलब्ध करून देण्यात आलेली सुमारे एक कोटींची रोकड दुपारी एक वाजताच संपल्याचे समजते. त्यामुळे दुपारनंतर नोटा बदलण्याचे काउंटर बंद करून टाकले. रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटा बॅँका, पोस्टात जमा करण्याची व बदलण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी बॅँका व पोस्ट कार्यालयात नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)