शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:58 IST

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले.

ठळक मुद्देआनंदवली शिवारात घडली घटना

नाशिक : आनंदवली शिवारातील वापरात नसलेल्या एका निर्जन इमारतीत एकत्र येत दोघा मित्रांनी ओली पार्टी केली. यावेळी दोघांमध्ये जुन्या काही कारणांवरुन भांडण झाले. यावेळी एकाने मोठा दगड उचलून दुसऱ्याच्या डोक्यात टाकून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली. यानंतर मद्यपी संशयिताने खूनाची कबुली देत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) याने त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्यासोबत मद्य खरेदी केले. यानंतर पार्टी कोठे करायची? यावर खल करत आनंदवली शिवारातील गंगापूररोडलगत वापरात नसलेल्या निर्जन इमारतीत दोघेही जाऊन बसले. तेथे दोघा मित्रांनी सोबत मद्य रिचविले. मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी एकमेकांची कुरापत काढून भांडण केले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी संशयित रुपेश याने मनात राग धरुन त्याच्यासोबत बसलेल्या महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले.

यानंतर रुपेशने इमारतीतून बाहेर पडत तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाला स्वत:केलेल्या गुन्ह्याबाबत सांगितले. त्या नागरिकाने त्यास धरुन ठेवत तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले. तसेच इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनDeathमृत्यू