आधारवरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST2017-08-23T22:51:51+5:302017-08-24T00:26:29+5:30

पाच वर्षांनंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी आधार कार्डवरील आपल्या हातांच्या बोटांचे ठसे जुळूून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

 Fingerprints | आधारवरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

आधारवरील बोटांच्या ठशांसाठी भुर्दंड

संजय शहाणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : पाच वर्षांनंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी आधार कार्डवरील आपल्या हातांच्या बोटांचे ठसे जुळूून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सुमारे बारा वर्षांपूर्वी आधार कार्ड ही योजना शासनाने राबविली. त्यावेळी परिसरातील समाजमंदिरांमध्ये ही योजना राबविण्यात आली. लांबच लांब रांगा लावून नागरिकांनी आधार कार्ड काढले. आधार कार्ड हे शासनाच्या विविध योजनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये बँकेत खाते उघडणे, ओळखपत्र, पॅन कार्ड जोडून घेणे, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी, वाहनपरवाने काढणे यांसह विविध दाखले काढण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी बहुतेक नागरिक जागृत झाले आहे.
आधार कार्ड काढताना दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे छायाचित्र घेण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्ती तिच आहे की तोतया हे ओळखणे सुलभ होते. सदर व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे ठसे संगणकावर घेतल्यावर त्याचा आधार कार्ड असलेली संपूर्ण माहिती येते. परंतु सुमारे चार ते पाच वर्षांनी बहुतेकांच्या हाताच्या बोटांच्या रेषांमध्ये बदल होतो. त्यामुळे त्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे घेतल्यास ते जुळत नाही. आता सर्वच कंपन्यांनी आधार कार्डशी संबंधित व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे ठसे जुळले तर लगेच सीमकार्ड देतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title:  Fingerprints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.