शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून तब्बल दोन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:02 IST

शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून एका आठवड्यात विविध ठिकाणी अस्वच्छता करून नियमभंग करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्त्यांकडूनच ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देस्वच्छ शहर सर्वेक्षण : महापालिकेकडून दंडात्मक कारवाईचा धडाका

नाशिक : शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून एका आठवड्यात विविध ठिकाणी अस्वच्छता करून नियमभंग करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्त्यांकडूनच ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने जेारदार तयारी सुरू असून आता अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास वेग आला आहे. १५ ते २१ जानेवारी दरम्यान महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी अस्वच्छता करण्याबरोबरच आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  २१६ जणांकडून तब्बल २ लाख ४ हजार १८० रूपये वसूल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक कारवाया मास्क न वापरणाऱ्यांवर करण्यात आल्या आहेत. यात ३६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ हजार २०० रूपयांचा दंंड वसूल करण्यात आला आहे. तर प्रतिबंधित प्लास्टीक वापरल्याप्रकरणी १३ जणांकडून ६५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. घंटागाडीत कचरा देताना त्यात ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण न केल्याबद्दल ९१ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३० हजार ३०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. तर एकदा अशाप्रकारे दंड केल्यानंतर देखील पुन्हा कचरा वर्गीकरण न केल्याबद्दल एका व्यक्तीकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पालापाचोळा जाळल्याबद्दल दोन जणांकडून  १५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून पाच जणांकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोकळ्या भूखंडांवर डेब्रीज साहित्य टाकल्याप्रकरणी  १५ जणांकडून १३ हजार ८०० रूपये युजर चार्जेस तर ७ जणांकडून १४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून २७ हजार ४०० रूपये तर नदी नाल्यात कचरा टाकणाऱ्या आठ जणांकडून २ हजार ८०० रूपये,  रस्यावर कचरा टाकल्याप्रकरणी ९ जणांकडून ११ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांनी अस्वच्छता केल्या प्रकरणी ५ हजार ७८० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. दंडामुळे महापालिका मालामालस्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने एप्रिलपासून जोरदार कारवाई करण्यात येत असून आत्तापर्यंत ६ हजार ५३ प्रकरणात ३४ लाख ३३ हजार ६१० रूपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसा