पिंपळगावच्या चिंचखेड चौफुलीला अवैध पार्किंगचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:01 IST2019-02-13T18:00:38+5:302019-02-13T18:01:27+5:30
पिंपळगाव बसवंत : ग्रामीण भागातील अव्वल क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव शहराला सतत वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असून सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने चिंचखेड चौफुलीला अवैध पार्किंगने विळखा घातल्याचे पहावयास मिळत आहे.

पिंपळगावच्या चिंचखेड चौफुलीला अवैध पार्किंगचा विळखा
पिंपळगाव बसवंत ही मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी खरेदीसाठी येणाºया नजिकच्या गावाहून येणाºया ग्राहकांची वर्दळ असते. वाहने नेमकी कोठे लावावीत याचे भान नसल्याने वाहतुकीला आणि पादचाºयांना गैरसोयीचे होत आहे. पिंपळगाव चिंचखेड चौफुलीवर उड्डाणपुलाचे काम सुरु असून याठिकाणीच खरेदीसाठी बाजार उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनधारक रस्त्यात वाहने उभी करु न खरेदीसाठी येथे गर्दी करतात. तसेच याच भागात दवाखाने असल्याने रु ग्णांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुली, बस स्थानक, स्टेट बँक, निफाड फाटा, वणी चौफुली अलीकडे जुना महामार्ग, वेशीकडून मेनरोड, निफाड रस्ता, बँक मार्ग अशा मार्गावर शहरात विविध व्यवसायाची काही दुकाने आहेत. बाबा कॉम्प्लेस ,छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेस अशी खासगी व दहापेक्षा अधिक व्यापारी संकुल आहेत. परंतु पार्किंगची सोय नसल्याने वस्तू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाहने महामार्गाच्या रस्त्यात तासन्तास उभी असतात. दुकानासमोर वाहने उभी राहिल्याने व्यवसायिक व नागरिकांमध्ये अनेकदा वाद होण्याचे प्रसंगही उद्भवतात. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर बेशिस्त पार्किंगमुळे पिंपळगाव शहर वाहनांनी पूर्णपने वेढल्याचे चित्र बघायला मिळते. परिणामी व्यावसायिकांना व खरेदीसाठी आलेल्या बाहेरील ग्राहकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.