नाम फाउंडेशनला आर्थिक मदत
By Admin | Updated: November 30, 2015 23:12 IST2015-11-30T23:12:18+5:302015-11-30T23:12:45+5:30
चार लाखांचा निधी : सातपूरमधील पंचवीस शेतकऱ्यांची माणुसकी

नाम फाउंडेशनला आर्थिक मदत
सातपूर : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करीत आत्महत्त्या करू नका, असा संदेश देत नाशिक पश्चिम पट्ट्यातील सुमारे पंचवीस शेतकऱ्यांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेला चार लाखांची मदत केली.
सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर रोडवरील शेतकऱ्यांनी यापूर्वी बीओटी तत्त्वातून होऊ पाहणाऱ्या रस्त्याला विरोध केला होता. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रकल्प शासनाला गुंडाळावा लागला. आता तोच रस्ता सिंहस्थ निधीतून झाला आहे. याबरोबरच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.
यामध्ये प्रामुख्याने अॅडव्होकेट प्रभाकर खराटे, दिगंबर ढगे, मनसे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले रामदास चव्हाण, उत्तमराव खांडबहाले, देवीदास पगार, भाऊसाहेब खांडबहाले, पोपटराव गामने, राजाभाऊ ढगे, शिवाजी ढगे, संदीप विसे, शिवसेना तालुकाध्यक्ष निवृत्ती लांबे, अशोक लगड, दिनकर मोरे, रामदास दाते, बबन जाधव, किरण दाते, सदाशिव पालखेडे, भीमराव कापसे, शिवाजी भावले, मोहन खांडबहाले, विष्णू ढगे, भाऊसाहेब पालखेडे, बाळासाहेब चव्हाण, देवराम भावले आदिंनी पुढाकार घेतला.