शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोणजाई गडाच्या विकासाला आर्थिक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 17:02 IST

विंचूर : साडेचार कोटींच्या निधीमुळे रुपडे पालटणार

ठळक मुद्देपर्यटन विकास योजनेंतर्गत तीन कोटी पन्नास लक्ष रु पये, ग्रामविकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकासासाठी ८७ लक्ष असा एकूण ४ कोटी ३८ लक्ष रु पयांचा निधी मंजूर झाला आहे.

विंचूर : निफाड तालुक्यातील ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या लोणजाई मातेच्या गडावर विविध विकासकामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भरघोस निधी मंजुर झाल्याने पायाभुत सुविधांसह विकासकामांमुळे लोणजाई माता मंदिराचे रु पडे पालटणार असून, निफाड तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र अशी नविन ओळख मिळणार आहे.निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून पाच ते सहा किमी अंतरावर विंचूर नजीक सुभाषनगर गावाजवळ आहे. जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणजाई माता मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत गेल्या वर्षी ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला होता. तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन स्थळांचा विकास व तेथे पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजुर केल्याने गडावर विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत तीन कोटी पन्नास लक्ष रु पये, ग्रामविकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकासासाठी ८७ लक्ष असा एकूण ४ कोटी ३८ लक्ष रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथे प्रसादालय, मुख्य प्रवेशद्वार, पर्यटकांसाठी बैठक ओटे, डोंगर रस्ते, निरीक्षण मनोरे, अ‍ॅम्पी थिएटर संगीत कारंजे, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन, भक्त निवास, स्वच्छता व स्नानगृहे बांधण्यात येणार असल्याने लोणजाई डोंगरावर भाविक व पर्यटकांची मांदियाळी बघावयास मिळणार आहे. सद्यस्थितीत डोंगरावर सात हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते.मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडश्रीमंत बाजीराव पेशव यांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी लोणजाई डोंगरावर सुंदर असे मंदिर बांधले. माजी सरपंच मधुकर दरेकर यांच्यासह स्थानिकांनी लोकसहभागातून तसेच नाना महाराज भक्त परिवार यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. १८ फूट उंचीचा १०८९ चौ. फुटाचा मंदिराचा गाभारा व प्रशस्त सभामंडप भाविकांचे लक्ष वेधुन घेतो. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी वर्गाने तसेच पंचायत समितीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण