पूरग्रस्त केमिस्टांना आर्थिक मदत
By Admin | Updated: August 26, 2016 23:55 IST2016-08-26T23:55:11+5:302016-08-26T23:55:54+5:30
पूरग्रस्त केमिस्टांना आर्थिक मदत

पूरग्रस्त केमिस्टांना आर्थिक मदत
नाशिक : नाशिक जिल्हा केमिस्ट अॅँड ड्रगिस्ट असोसिएशन व अॅडहॉप कमिटीच्या वतीने सायखेडा येथील ११ केमिस्ट (मेडिकल व्यावसायिक) यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश देऊन मदत करण्यात आली.
गोळे कॉलनीतील केमिस्ट भवन येथे शुक्रवारी (दि.२६) दुपारी झालेल्या या कार्यक्रमास एम. एस. सी. डी. ए. चे अध्यक्ष अजित पारख, मयूर अलई, हेमंत पाठक, प्रमोद रानडे, विजय तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते. सायखेड्यातील या केमिस्टांचे ३ आॅगस्ट रोजी गोदावरीला आलेल्या महापुरामुळे व त्याचदरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या व्यवसायाला नव्याने उभारी मिळावी या हेतुने सामाजिक भावनेतून ही मदत करण्यात आली. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)