मयत सभासदांच्या वारसाला पंधरा हजार रु पये आर्थिक मदत

By Admin | Updated: August 14, 2016 01:00 IST2016-08-14T00:56:36+5:302016-08-14T01:00:55+5:30

मयत सभासदांच्या वारसाला पंधरा हजार रु पये आर्थिक मदत

Financial assistance of 15 thousand rupees to the family members of the deceased | मयत सभासदांच्या वारसाला पंधरा हजार रु पये आर्थिक मदत

मयत सभासदांच्या वारसाला पंधरा हजार रु पये आर्थिक मदत

 कळवण : श्री आनंद ग्रामीण सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून अल्पावधीतच प्रगती साधली सहकाराबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सामाजिक
उपक्र म राबविले. ही परंपरा सदैव चालू ठेवू, अशी ग्वाही देऊन गेल्या १५
ते २० वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करत
आहे.
यावर्षीपासून मयत सभासदांच्या वारसाला पंधरा हजार रु पये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा आनंद नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
पतसंस्थेने आजपर्यंत जी प्रगती केलेली आहे याचे सर्व श्रेय सभासद, ठेवीदार, कर्मचारी वर्गाला जात असून सभासदांनी संस्थेच्या व्यवहारात सहभागी व्हावे, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी यावेळी केले. श्री आनंद नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेत संस्थापक अध्यक्ष सुनील जैन, अंजुम मिर्झा, जितेंद्र कापडणे, व्यवस्थापक छगन सोनवणे, बिरारी, कुणाल कटारिया, सायली कायस्थ, मन्सुरी, आदिंनी मनोगते व्यक्त करून संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या कामकाजाचे कौतुक केले.
या वार्षिक सभेप्रसंगी उपाध्यक्ष शरद खेरनार, जनसंपर्क संचालक सुनील जैन, संचालक अशोक कोठावदे, अविनाश कोठावदे, प्रकाश पाटील, वसंत कोठावदे, किशोर वेढणे, प्रा. बी. एच. भारती, रमेश देवघरे, फरीद शेख, शोभा
दुसाने, शारदा शिरोरे, गिरीश मालपुरे, दत्तू ठाकरे, व्यवस्थापक श्रीकृष्ण बिरारी, छगन सोनवणे आदिंसह मान्यवर, सभासद उपस्थित होते.



 

Web Title: Financial assistance of 15 thousand rupees to the family members of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.