‘त्या’ कुटुंबीयांना आर्थिक मदत
By Admin | Updated: April 24, 2016 23:37 IST2016-04-24T23:29:32+5:302016-04-24T23:37:57+5:30
बागलाण : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

‘त्या’ कुटुंबीयांना आर्थिक मदत
सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या बुधवारी कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, कुटुंबीयांना प्रत्येकी रोख ११ हजार रुपयांची मदत केली आहे. शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत व जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते दोन्ही कुटुंबीयांच्या घरी जाऊन मदतीचा धनादेश देण्यात आला.
गेल्या बुधवारी तालुक्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली. विंचुरे येथील शेतकरी आप्पा नानाजी गायकवाड, तर मोसम खोऱ्यातील ब्राह्मणपाडे येथील अल्पभूधारक शेतकरी बापू रामभाऊ अहिरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मृत्यूला कवटाळले. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी शिवसेनेतर्फे संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी पदाधिकाऱ्यांसह आत्महत्त्याग्रस्त कुटुंबीयांचे घरी जाऊन सांत्वन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष नंदन, शहराध्यक्ष शरद शेवाळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुन्ना सोनवणे, उपजिल्हाध्यक्ष आनंदा महाले, युवा सेनेचे सचिन सोनवणे, ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, राजन चौधरी, मंगलसिंग जोहरी, हेमंत गायकवाड, चेतन पाटील, दिलीप अहिरे, वसंत सोनवणे, सुभाष खैरनार, शेखर परदेशी, समीर सावंत, संभाजी सावंत, भाऊसाहेब कापडणीस, धनंजय नंदन, संदीप कसबे, दत्ता नंदाळे, पोपट घरटे, दुर्गेश कासार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)