शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फायनान्स कंपनीची ६२ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:47 IST

व्यावसायिक अथवा खासगी वापराच्या वाहनखरेदीसाठी एका खासगी गुंतवणूक व अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून वाहन कर्ज मिळवून त्याची परतफेड न करता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

नाशिक : व्यावसायिक अथवा खासगी वापराच्या वाहनखरेदीसाठी एका खासगी गुंतवणूक व अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून वाहन कर्ज मिळवून त्याची परतफेड न करता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.मायको सर्कलजवळील चोलामंडलम इनव्हेटस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी प्रफुल्ल अरुण पाटील (३८) यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणांमधील कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे.चेहडी येथील शैला शिरोळे (४९) व भाविक शिरोळे (२७)यांनी कंपनीकडून वाहन खरेदीसाठी ८ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज घेऊन वाहनाची खरेदी केली.  परंतु वाहनक र्जाची परफेड न करताच परस्पर संबंधित वाहनाची विल्हेवाट लावल्याचा आरोप कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी केला आहे.तसेच घोटीतील अब्दुल रशीद शेख (४०) व अब्दुल हमीद शेख (३२) यांनी ४ लाख ३० हजार ९० रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनाची कर्ज परतफेड न करता परस्पर विल्हेवाट लावली, त्याचप्रमाणे अंदरसूल येथील शिवाजी कहार (४६) व मंगल कहार यांनी यांनी वाहन खरेदीसाठी ८ लाख ३९ हजार ७३५ रुपये कर्ज घेऊन वाहन खेरदी केले होते. मात्र कर्जाची परतफेड न करता वाहनाची विल्हेवाट लावली. सायखेडा येथील अरुण सानप (५५) व परीक्षित सानप (२८) यांनी दोन लाख एक हजार २९० कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनाची कर्जफेड न करता परस्पर विल्हेवाट लावली. सातपूरच्या स्वारबाबानगर येथील विठ्ठल साळवे (४७) व नंदा साळवे (४६) यांच्याविरोधातही अशाचप्र्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी कंपनीकडून दोन लाख ७६ हजार ७५४ रुपयांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केले होते. मात्र कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप वसुली अधिकाºयांनी केला आहे. सारसंगम सोसायटीतील प्रदीप ब्रह्मेचा (३३) व गुलाबचंद ब्रह्मेचा यांनी ४ लाख २१ हजार चारशे रुपयांचे कर्ज काढून वाहन खरेदी केले. परंतु कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाPoliceपोलिस