शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

...अखेर १९९ शेतकऱ्यांच्या पदरात पडले पावणे सात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:16 IST

नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. 

ठळक मुद्दे१९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे; सर्वाधिक १८१ गुन्हे नाशिकमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसानी मिळवून दिली १७७ शेतकऱ्यांना रक्कम

नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामिण, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेतला गेला. यामध्ये सर्वाधिक १८१ गुन्हे नाशिक ग्रामिणमध्ये दाखल झाले असून आतापर्यंत वरील जिल्ह्यांमधील एकुण १९९ शेतकऱ्यांच्या पदरात ६ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम पडली आहे. उर्वरित ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपयांची रक्कम देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली.शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त अन‌् गुटखा-मटका मुक्त उत्तर महराष्ट्र असे यापुढे नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांचे मिशन असेल, अशी घोषणा दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरिक्षकपदाचा पदभार स्विकारताच केली होती. यानुसार त्यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षकांना शेतकरी फसवणुक, सुशिक्षित बेरोजगारांच्या फसवणुकीच्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, तीन महिन्यांत नाशिक परिक्षेत्रात सुमारे १ हजार १९२ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा पाठपुरावा करत १९१ व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आणि उर्वरित २०० व्यापाऱ्यांशी तडजोड करत पोलिसांनी १९९ व्यापाऱ्यांना सुमारे सहा कोटी ७५ लाख ८८ हजार १०० रुपयांची रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आल्याचे दिघावकर म्हणाले.अहमदनगरमध्ये ९, जळगाव, धुळ्यातून प्रत्येकी ४ तर नंदूरबारमधून १४ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे अर्ज पोलिसांकडे केले होते. यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातून १ हजार १६१ अर्ज नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाले होते. यामध्ये एकूण ४४ कोटी ५७ लाख ७४ हजार ३५४ रुपयांची मोठी फसवणुक झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांचा राज्यात व राज्याबाहेर कसोशीने शोध सुरु केला.नाशिकच्या १७७ शेतकऱ्यांना मिळाली रक्कमनाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFarmerशेतकरीArrestअटकfraudधोकेबाजीagricultureशेती