अखेर १६७ एकर क्षेत्रावर ‘साधुग्राम’चे आरक्षण
By Admin | Updated: September 17, 2014 00:11 IST2014-09-16T01:06:18+5:302014-09-17T00:11:17+5:30
अखेर १६७ एकर क्षेत्रावर ‘साधुग्राम’चे आरक्षण

अखेर १६७ एकर क्षेत्रावर ‘साधुग्राम’चे आरक्षण
नाशिक : पंचवटीतील तपोवन परिसरातील १६७ एकर क्षेत्रात साधुग्रामचे आरक्षण टाकण्यासंदर्भात शासनाचे सोपस्कार पूर्ण झाले असून, अंतिमत: या क्षेत्रावरील आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने याबाबत महापालिकेस नुकतेच कळविले असून, त्यानुसार भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यासाठी मिळकत विभागाला कळविण्यात आले आहे.
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम विकसित केले जाते. त्यासाठी जागेची गरज भासते. गेल्यावर्षी १०५ एकरमध्ये कुंभमेळा भरविण्यात आला होता. परंतु त्यानंतरही कुंभमेळ्यात साधुग्रामची जागा लागणारच असते. त्या पार्श्वभूमीवर ३२३ एकर क्षेत्रात यंदा साधुग्राम साकारले जाणार आहे. ५४ एकर क्षेत्र अगोदरच महापालिकेने विकत घेतले आहे. उर्वरित जागा टप्प्याटप्प्याने ताब्यात घेण्यात येत आहे. त्यापैकी १६७ एकर क्षेत्रासाठी राज्य शासनाने आरक्षण प्रस्तावित केले आणि गेल्या वर्षी मे महिन्यात या क्षेत्राबाबत हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही करण्यात आली. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे त्याबाबत हरकतींची सुनावणी झाली होती. साधुग्राम परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध केला.