अखेर पॉवरडील कंपनीचे टाळे खुले
By Admin | Updated: November 11, 2015 23:21 IST2015-11-11T23:19:33+5:302015-11-11T23:21:04+5:30
रविवारपासून सुरुवात : शिवाजी चुंभळे यांनी केली मध्यस्थी

अखेर पॉवरडील कंपनीचे टाळे खुले
नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या विल्होळी येथील पॉवरडील एनर्जी सिस्टीम या कंपनीचे प्रवेशद्वार अखेर बुधवारी खुले करण्यात आले. महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे व विल्होळीतील ग्रामस्थांच्या मध्यस्थीने व्यवस्थापनाशी चर्चा होऊन कंपनी पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर येत्या रविवार (दि. १५) पासून कंपनीतील यंत्रांची धडधड पुन्हा सुरू होणार आहे.
विल्होळी योथील पॉवरडील एनर्जी सिस्टीम या कंपनीत सुमारे अडीचशे कामगार आहेत. कंपनीत अखिल भारतीय मजदूर सभेची युनियन आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून वेतनवाढ आणि अन्य कारणावरून वाद निर्माण झाला होता आणि कंपनीने आर्थिक नुकसानीचे कारण पुढे केले होते.
दरम्यान, कामगार उपआयुक्तांकडे यासंदर्भात वाद प्रविष्ट असतानाच व्यवस्थापनाने १२ जूनपासून टाळेबंदी जाहीर केली होती.