शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर महापालिका आयुक्तपदी गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 19:34 IST

अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देगमे हे नाशिकचे जावईदेखील आहेतराधाकृष्णन अन् राधाकृष्ण...

नाशिक : मागील महिन्यात २१ तारखेला तुकाराम मुंढे यांची बदली राज्याच्या नियोजन विभागात सहसचिवपदी करण्यात आली. मागील तेरा दिवसांपासून महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार प्रभारी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नवे आयुक्त कोण? याविषयी विविध नावे समोर येत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे.गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत सुरू होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. दरम्यान, आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाली. महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार ८ फेबु्रवारी रोजी मुंढे यांनी स्विकारला होता. कायद्यावर बोट ठेवून त्यांचा काम करण्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसला आणि त्यातून त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरुवात झाली. महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून पहिली ठिणगी पडली आणि त्यानंतर नगरसेवक निधी रद्द करणे, अगोदरच्या आयुक्तांनी मंजूर केलेली कामे रद्द करणे, करवाढ करणे यांसारख्या वादांची भर पडत गेली.५४वर्षीय नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी म्हणून कामकाज केले आहे. तसेच नंदूरबार जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील राहिले आहेत. ३मे २०१७ रोजी गमे यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते एमएसस्सी (अ‍ॅग्रीकल्चर) आहेत. मूळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावईदेखील आहेत.---राधाकृष्णन अन् राधाकृष्ण...जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आणि महापालिका आयुक्तपदी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्यामुळे नाशिकचा कारभार आता ‘राधाकृष्ण’ यांच्याकडे संपुर्णत: आला आहे. महत्त्वाच्या दोन्ही पदांवर समान नामधारी व्यक्ती असल्यामुळे जिल्ह्याची आणि शहराची भविष्याची घोडदौड यशस्वीपणे होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.--

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.tukaram mundheतुकाराम मुंढे