...अखेर लहाडे यांचे प्रयाग हॉस्पिटल सील
By Admin | Updated: April 10, 2017 02:15 IST2017-04-10T02:15:21+5:302017-04-10T02:15:37+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील निलंबित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान केल्याचा आरोप आहे

...अखेर लहाडे यांचे प्रयाग हॉस्पिटल सील
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील निलंबित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करत प्रयाग रुग्णालय सुरू केले होते. याप्रकरणी आरोग्याधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात लहाडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी (दि.९) संध्याकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने प्रयाग सील केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उघडकीस आलेल्या अवैधरीत्या २४ आठवड्याच्या गभर्वती महिलेच्या गर्भपात प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिल्हा रुग्णालयाती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. वर्षा
लहाडे यांचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानसभेत फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने कारवाईला गती देत शनिवारी (दि.८) म्हसरूळ पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेचे आरोग्य विभागाचे पथक दिंडोरीरोडवरील त्या प्रयागवर येऊन धडकले. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दुमजली रुग्णालयाची झाडाझडती घेत मेडिकल, लहाडेंचे कक्ष, खोल्या सील केल्या. तसेच मुदतबाह्य औषधांचा साठादेखील जप्त केला.