...अखेर कचराकुंडी हटविली

By Admin | Updated: September 26, 2016 23:06 IST2016-09-26T23:05:17+5:302016-09-26T23:06:41+5:30

ओझर : मारुती वेस परिसरातील नागरिकांमध्ये समाधान

... finally the garbage was removed | ...अखेर कचराकुंडी हटविली

...अखेर कचराकुंडी हटविली

ओझर : येथे मारुती वेसजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली कचराकुंडी प्रशासनाने आज काढत तेथील जागाही स्वच्छ केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर कचराकुंडी व दुर्गंधीबाबत ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शेजारी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थी त्रस्त असल्याचे वृत्त १२ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. मंदिरात नियमित येणाऱ्या भाविकांना तर दर्शन घेण्यापूर्वीच कचऱ्याचे दर्शन होत असे. परंतु येथे यापूर्वी तात्पुरती स्वच्छता होत असे. परंतु आता खऱ्या अर्थाने वेस सुशोभित झाली असून, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाले यांनी ओझर येथील ग्रामविकास अधिकारी तसेच प्रशासनाला ताबडतोब ही जागा स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही जागा स्वच्छ करण्यात
आली. याबाबत येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामपंचायतीनेदेखील नागरिकांना आता रस्त्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: ... finally the garbage was removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.