शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

...अखेर पोलिसांच्या हद्दीचे फलक ‘झळकले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:29 IST

पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात अनेकदा गुन्हेगारांना रान मोकळे मिळत होते किंवा गुन्हे घडल्यानंतर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी, असा संभ्रमदेखील निर्माण होत होता. कारण कुठल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठे? हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. यावर मात करण्यासाठी आयुक्तालयाच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांची हद्द दर्शविणारे मार्गदर्शक फलक शहरात जागोजागी झळकल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसंभ्रम दूर : पोलीस ठाण्यांच्या माहितीसाठी सुविधा

नाशिक : पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात अनेकदा गुन्हेगारांना रान मोकळे मिळत होते किंवा गुन्हे घडल्यानंतर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी, असा संभ्रमदेखील निर्माण होत होता. कारण कुठल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठे? हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. यावर मात करण्यासाठी आयुक्तालयाच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांची हद्द दर्शविणारे मार्गदर्शक फलक शहरात जागोजागी झळकल्याचे दिसून येत आहे.एखाद्या ठिकाणी अपघात, लूटमार, घरफोडी झाल्यास आपण ज्या ठिकाणी आहोत, तो परिसर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो, याविषयी नागरिकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था होती. त्याचप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर पंचनामा करताना पोलीसही काहीवेळा बुचकुळ्यात पडत होते. तसेच विविध रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना अत्यावश्यक आपत्कालीन मदतीची गरज भासल्यास नागरिकदेखील अनोळखी परिसरात गोंधळून जात होते. तसेच नाशिकच्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांनाही अनेकदा पोलिसांची मदत घ्यावयाची गरज पडल्यास त्यांनाही संपर्क करताना अडचणी उद्भवत होत्या. आयुक्तालयाच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी अंबड, सरकारवाडा, भद्रकाली, उपनगर या जुन्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाणे तसेच पंचवटी, गंगापूर पोलीस ठाण्यांचे विभाजन होऊन म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाणे अस्तित्वात आले. यामुळे पोलीस ठाण्यांची हद्ददेखील बदलली. यामुळे रहिवाशांचा संभ्रम अधिकच वाढीस लागला होता. अजूनही नव्याने अस्तित्वात आलेल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठून कोठेपर्यंत आहे, हे सर्वसामान्यांना फारसे लक्षात येत नाही. ही बाब लक्षात घेत पोलीस आयुुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या चारही दिशा लक्षात घेत फलक लावण्याचे आदेश दिले. पंधरवड्यात शहरातील सर्वच उपनगरांमधील पोलीस ठाण्यांची हद्द झळकविणारे फ लक नागरिकांच्या नजरेस पडू लागले आहे....असे आहेत फलकपोलीस ठाण्याचे नाव व हद्द, तसेच पोलिसांचे नियंत्रण कक्ष, संबंधित पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक आदी माहिती या फलकांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हे फलक लोखंडी स्वरूपात बनविण्यात आले असून, रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये दर्शनी भागात ते लावण्यात आले आहेत. या फलकांना गडद निळा रंग देण्यात आला आहे. तसेच फलकाच्या अग्रभागी महाराष्टÑ पोलिसांचे बोधचिन्हदेखील पहावयास मिळते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस