...अखेर वडाळारोडवरील खड्डे बुजविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:34+5:302020-12-11T04:41:34+5:30

वडाळारोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची वाहने आदळून नुकसान होत होते. पावसाळ्याच्या अगोदरपासून नासर्डी नदीवरील पुलापासून शिवाजीवाडी ते थेट रहनुमा नगरपर्यंत ...

... finally filled the potholes on Wadala Road | ...अखेर वडाळारोडवरील खड्डे बुजविले

...अखेर वडाळारोडवरील खड्डे बुजविले

वडाळारोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची वाहने आदळून नुकसान होत होते. पावसाळ्याच्या अगोदरपासून नासर्डी नदीवरील पुलापासून शिवाजीवाडी ते थेट रहनुमा नगरपर्यंत रस्त्याची चाळण झाली होती. यामुळे येथून मार्गस्थ होताना वाहने खड्ड्यांमध्ये आदळून अपघात घडत होते. या रस्त्यालगत लॉन्स, दुकाने, शाळा असल्यामुळे नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता अशोकामार्गासह इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागावाला जोडतो. वाहतुकीचा मुख्य रस्ता असूनदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर ‘लोकमत’मधून या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यानंतर मनपाने जागे होत लोकमतच्या बातमीची दखल घेत डांबर टाकून रस्त्याचे अस्तरीकरण करत सर्व खड्डे बुजविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: ... finally filled the potholes on Wadala Road