अखेरपर्यंत मुंढे यांची बदली रद्दचे प्रयत्न ठरले फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:19 IST2018-11-23T01:19:07+5:302018-11-23T01:19:48+5:30
नाशिक : अकरा वर्षांत बारा वेळा बदली झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर वादग्रस्तेचा ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांचा पाठीराखा वर्गही असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यासाठी समर्थक केवळ रस्त्यावरच उतरले नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी ठरले नाही. दरम्यान, मुंढे यांचा स्वभाव बघता ते मुदतपूर्व बदलीला कॅटमध्ये आव्हान देण्याच्या तयारीत नसल्याचेही वृत्त आहे.

मुंढे यांनी कार्यालय सोडले : तडफदार कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी पदभार सुपूर्द करीत आपला कार्यभार सोडला.
नाशिक : अकरा वर्षांत बारा वेळा बदली झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर वादग्रस्तेचा ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांचा पाठीराखा वर्गही असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यासाठी समर्थक केवळ रस्त्यावरच उतरले नाही, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी ठरले नाही. दरम्यान, मुंढे यांचा स्वभाव बघता ते मुदतपूर्व बदलीला कॅटमध्ये आव्हान देण्याच्या तयारीत नसल्याचेही वृत्त आहे.
महापालिकेत मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय हे लोकप्रतिधींना रुचणारे नसल्याने त्यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण होते. मुंढेदेखील आपले बिºहाड पाठीवर असल्याचे सांगत होते. त्यांनी यापूर्वीदेखील बदलीच्या चर्चेला विरोध केला नाही. केवळ शहरात काम दिसावे आणि कुटुंबीयाची आबाळ होऊ नये यासाठी एकवर्षाचा कालावधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी सुरुवातीलाच व्यक्त केली होती. महापालिकेत आयुक्त टिकेना.. महापालिकेत आयुक्त कृष्णकांत भोगे (१९९९ ते २००२) यांना आत्तापर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करता आला आहे. त्याखेरीज कोणत्याही अधिकाऱ्याला पूर्ण कार्यकाळ सरकारमुळे शक्य झालेले नाही. गेल्या काही वर्षांत, तर संजय खंदारे, प्रवीण गेडाम, अभिषेक कृष्ण अशा कोणत्याही नियमित नियुक्ती असलेल्या अधिकाºयाला सरकारने पूर्ण काळ काम करण्याची संधी दिली नसल्याने मुंढे यांच्याऐवजी येणारे नवे आयुक्त तरी कार्यकाळ पूर्ण करतील किंवा नाही याविषयी शंका आहे.