शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

...अखेर ‘कॅट्स’मधील बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:43 IST

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला.

ठळक मुद्देवनविभागाने लावला होता ‘ट्रॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला.या भागात बिबट्यासारख्या वन्यजिवांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडून नाशिक पश्चिम वनविभागाकडे पत्रांद्वारे केल्या जातात. असेच एक पत्र सोमवारी (दि.१०) वनविभागाला कॅट्सकडून प्राप्त झाले होते. या पत्राची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, उत्तम पाटील आदींनी कॅट्सच्या परिसरात भेट देत पाहणी करून बिबट असल्याची खात्री पटविली. यानंतर बुधवारी (दि.१२) वनकर्मचाºयांनी या भागात पिंजरा तैनात केला.दररोज वनकर्मचाºयांकडून या पिंजºयाबाबतची माहिती कॅट्समधील कर्मचाºयांकडून जाणून घेतली जात होती. तसेच दोन ते तीन दिवसांनंतर वनरक्षक पाटील हे पिंजरा लावलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत होते. पिंजºयात बिबट्या जेरबंद होत नव्हता.त्यामुळे त्यांनी या भागात पाहणी करून बिबट्याच्या संचाराच्या पाऊलखुणांद्वारे माग काढला आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी पिंजºयाची जागा बदलली. कॅट्सच्या पोस्ट क्रमांक-१ आणि हेलिकॉप्टरच्या हॅँगर या दोघांमधील मोकळ्या भागातील गवताने वेढलेल्या परिसरात पिंजरा लावण्यात आला. या पिंजºयात शनिवारी मध्यरात्री बिबट्या अडकला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कॅट्समधून वनकर्मचाºयांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजºयाचा दरवाजा खाली पडल्याची माहिती देण्यात आली. तत्काळ वनाधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठत खात्री केली असता बिबट्या पिंजºयात जेरबंद झालेला होता. तत्काळ वन्यप्राणी रेस्क्यू वाहनाद्वारे बिबट्याला पिंजºयातून वनविभागाने कॅट्समधून गंगापूर धरणालगतच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविले.चार बिबट्यांचा संचार?कॅट्सच्या परिसरात जंगल अधिक असून, मानवी हस्तक्षेपदेखील नसल्यामुळे या भागात किमान चार बिबटे मुक्तपणे संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत संचार करत असल्याची बाब लष्करी अधिकाºयांकडून नाशिक पश्चिम वनविभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या