...अखेर कोट्यवधींना गंडविणारा विनोद पाटीलला अटक
By Admin | Updated: March 16, 2017 19:12 IST2017-03-16T19:12:24+5:302017-03-16T19:12:24+5:30
कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालक विनोद पाटील मागील सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत होता.

...अखेर कोट्यवधींना गंडविणारा विनोद पाटीलला अटक
नाशिक : कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालक विनोद पाटील मागील सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देत होता. अखेर आज आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या खेरवाडी परिसरात जाऊन पाटीलच्या मुसक्या आवळल्या.
मुख्य संचालक संशयित आरोपी विनोद पाटील याने सुमारे चार वर्षांपूर्वी हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटची स्थापना केली होती. तीस एजंट्समार्फत २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेची गुंतवणूक केली आहे़ पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतविली. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांची व्याप्ती वाढली असून, फसवणुकीचा आकडा ५.४९ कोटीवर पोहचला आहे.
हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या एकूण पाच संचालकांना पोलिसांनी सहा महिन्यांपुर्वीच अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश गुरुनाथ देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक संशयित विनोद बाळू पाटील (रा. नवीन नाशिक), सुशांत रमेश कोेठुळे (रा. तपोवन), भगवंत शिवाजी कोठुळे, महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), विकास सर्जेराव खंदळे, दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश शेषराव कामे (रा. नवीन नाशिक), विजय लक्ष्मण खुणकर, सुरेखा भगवंत कोठुळे या अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१२ सालापासून तर अद्याप पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाउस आॅफ बुलियन्स, हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट, हाउस आॅफ बिल्डकॉन, हाउस आॅफ अॅग्रो कम्युनिटी यांसह इतर कंपन्यांच्या माध्यमातून आपापसात संगनमत करत कटकारस्थान रचत अधिकृत एजंट असल्याचे सांगून ठेवीच्या रकमेवर दरमहा व्याज स्वरूपात काही कालावधीपर्यंत परतावा दिला आणि विश्वास संपादन करून घेत त्यानंतर परतावा देणे बंद केले. करारानुसार रकमेची मागणी केली असता रक्कम देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्थिक फसवणूक झाल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
विनोद पाटील हा सातत्याने पोलिसांबरोबर लपंडाव खेळत होता. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांच्या पथकाने खेरवाडी गाठले. पाटील याच्या मुसक्या आवळून त्याला नाशिकमध्ये आणले. जिल्हा न्यायालयापुढे संशयित पाटील यास हजर केले असता न्यायालयाने त्यास येत्या गुरूवारपर्यंत (दि.२३) पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांच्या वतीने सरकारी वकील अजय मिसर व जयदीप वैशंपायन यांनी कामकाज चालविले.