अखेरीस नाशिकमध्ये १९ टन ऑक्सिजन टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:06+5:302021-05-05T04:25:06+5:30

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या दौऱ्याच्या वेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दत्तक पित्याने केंद्र शासनाकडून काही ...

Finally 19 tonne oxygen tanker in Nashik | अखेरीस नाशिकमध्ये १९ टन ऑक्सिजन टँकर

अखेरीस नाशिकमध्ये १९ टन ऑक्सिजन टँकर

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या दौऱ्याच्या वेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दत्तक पित्याने केंद्र शासनाकडून काही मदत तर आणायची होती ना असा टोेला लगावला होता. त्यावर मंगळवारी (दि.४) टँकर येताच भाजपच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले आणि फडणवीस यांनी शब्द खरा केला, असा दावा करताना आता तरी विरोधकांनी अकारण आरोप करून तोंडाची वाफ दवडू नये, असा टोला महापौर सतीश कुलकर्णी, गटनेते जगदीश पाटील यांनी लगावला आहे. सकाळी हा टँकर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तो साेपवून त्यांच्या मार्फत ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. १९ पैकी सहा टन ऑक्सिजन जिल्हा शासकीय रुग्णालयास देण्यात आला. यावेळी टँकरचालकाचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमाताई हिरे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, भाजप शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, महेश हिरे आदी उपस्थित होते.

छायाचित्र आर फाेटाेवर ०४ ऑक्सिजन नावाने सेव्ह...

Web Title: Finally 19 tonne oxygen tanker in Nashik