शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भगूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST

भगूर शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.

ठळक मुद्देपंचक्रोशीतील गावे जोडणार विकासाला चालना; वाहतुकीची कोंडी टळणार

विलास भालेराव । भगूर : शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.भगूरमधून इतर शहरांच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी जुने रेल्वेगेट व मोरीपूल होता यामुळे भगूर व परिसरात अनेक रस्ते अडचणीचे ठरत होते. दळणवळण यंत्रणा व लोकसंख्या वाढत गेली त्यानुसार जुने रेल्वेगेट बंद होऊन नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला नवीन रेल्वेगेट तयार करण्यात आले तेथूनच भगूरसह परिसरातील तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील दळणवळणाचा मार्ग काहिसा सुकर झाला. गेल्या १५ ते २० वर्षांत भगूरला लागून असलेला विजयनगर परिसर विकसित होवून या ठिकाणी घरकुले, सोसायट्या उभ्या राहिल्या, विजयनगरची लोकसंख्या वाढल्याने वाहनांच्या भगूरच्या नवीन रेल्वे गेटसमोर रांगा लागू लागल्या. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडू लागल्याने या नवीन रेल्वे गेटवर उड्डाणपूल तयार करून दळणवळणाची समस्या सोडवावी, अशी मागणी होऊ लागली वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून भगूर रेल्वे गेटवर उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आजमितीला पूल पूर्णत्वास येत आहे.सदर पुलाच्या कामाची निविदा १८ कोटी २७ लाख रुपयांची आहे, परंतु मुख्य पूल बांधणीसाठी केंद्रीयमार्ग विभागाकडून १५ कोटी मंजूर झाले असून, पुलाची लांबी ४५० मीटर असून, रुंदी १२ मीटर आहे. यामध्ये एक अंडरपास रस्ता असून एक रस्ता विजयनगर परिसरासाठी राहणार आहे. इतर रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ मंजूर करण्यात आले आहेत. त्याचेही काम सुरू झाले आहे. सध्या पुलाच्या कामाची मुदत संपून साधारण २० महिने झाले आहे आणि अजून पूर्णत्वास जाण्यास नऊ महिने लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम, केंद्रीय महामार्ग आणि भारतीय रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अभियंता यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुख्य पुलाचे अंतिम फाउंडेशन पूर्ण केले जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूल पूर्णत्वास येणार आहे.दळणवळणाची होणार सोयरेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर खºया अर्थाने भगूर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे येथील व्यवसाय ओस पडले होते. परिणामी परिसरातील नागरिक देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर येथे खरेदी करण्यासाठी जात होते. भगूर परिसरातील अनेक व्यावसायिकांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथे राहण्यासाठी गेले त्यांनी तेथेच व्यवसाय थाटला आहे. आता नवीन पुलामुळे घोटी-सिन्नर रस्ता अतिशय जवळचा मार्ग होणार आहे. त्यामुळे भगूरच्या विकास, व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिककडे जाण्याची गरज भासणार नाही. उड्डाणपुलाच्या सोयीमुळे सिन्नरमार्गे जाणारा भाजीपाला भगूरच्या बाजारात येईल. नाशिक, नाशिकरोड येथील नागरिकांना सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे