.‘मूडस् आॅफ मुकेश’ला रसिकांची भरभरून दाद
By Admin | Updated: January 16, 2015 00:05 IST2015-01-16T00:04:22+5:302015-01-16T00:05:21+5:30
हार्मनी आर्टची रसिकांना नववर्षाची संगीत भेट

.‘मूडस् आॅफ मुकेश’ला रसिकांची भरभरून दाद
नाशिक : भावनाप्रधान गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय मुकेश यांची एकल आणि द्वंद्व गीते सादर करीत येथील ‘हार्मनी आर्ट’ गॅलरीतर्फे ‘मूडस् आॅफ मुकेश’ हा संगीत कार्यक्रम सादर करीत नाशिकच्या रसिकांना नववर्षाची अनोखी भेट दिली.
या नववर्षाच्या सदर संगीत समारंभात गिटारीस्ट जयंत पाटेकर यांनी ‘गायेजा गीत मिलनकी’ या गीताने सुरुवात केली. त्यानंतर ‘कई सदीयो से कई जन्मोसे’, ‘मेरे टुटे हुवे दिलसे’, ‘चांदको क्या मालूम’, ‘सजन रे झुट मत बोलो’ अशी सर्वांच्या ओठी रेंगाळत असलेली गीते सादर केली. उषा पाटेकर यांनी जयंत पाटेकर यांच्या समवेत ‘जीस दिलमे बसाता प्यार तेरा’, ‘किसी राहमे किसी मोड पर’, ‘मुझको इस रातकी तनहायी मे आवाज न दो’, ‘ओ मेरे सनम ओ मेरे सनम’, ‘इक प्यार का नगमा है’ अशी गीत गायली.
कार्यक्रमाचे निवेदक उस्मान पटणी यांनी ‘किसी की मुस्कराहटो पे हो नीसार’, ‘जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे’, ‘तेरी निगाहो पे मरमर गये हम’ आदी सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळविली. विद्या कुलकर्णी व सिंथेसायझर वादक किशोर पाटेकर यांनी ‘जाने कहा गये वो दिन’, ‘किसी राहमे किसी मोड पर’ही गीते तर प्रेक्षकांमधुन डॉ. शरद म्हसकर यांनी ‘जाने कहा गये वो दिन’ हे गीत तर सुधीर कुलकर्णी यांनी ‘दुनिया बनाने वाले क्या तेरे मनमे समाई’ आणि ‘ओहोरे ताल मिले नदीके जलमे’ ही अतिशय उडत्या चालिची गीते सादर केली.
त्यांना राजन अग्रवाल (ढोल, ढोलकी, कोंगो), अजय गायकवाड (अॅक्टोपॅड) यांनी साथ संगत केली.
प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब सोनवणे, मधुकर झेंडे, संगीतकार धनंजय धुमाळ, अॅड. साहेबराव पवार, डॉ. सरोज म्हसकर, अॅड. रंजना वावरे आदिंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नववर्षाची सुरुवात म्हणून आलेल्या प्रेक्षकांना गुलाबपुष्प व चहा देण्यात आला. राजा पाटेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)