शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

शाळा भरो ना भरो, पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:50 IST

कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.

ठळक मुद्देपेठ : समग्र शिक्षा अभियान; तालुकास्तरावर पाठयपुस्तके प्राप्त

पेठ : कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानादीत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनामोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येतात. या वर्षी कोरोनाचा संसर्ग आणी लॉकडाउन यामुळे पुस्तके प्राप्त होतात की नाही या विवंचनेत पालक व शिक्षक असतांना बालभारतीने मात्र लॉकडाउन पूर्वीच पुस्तकांची छपाई पूर्ण केल्याने पालकांची चिंता मिटली आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर जिल्हा स्तरावरून पुस्तके वाटप करण्यात आली. पेठ तालुक्याला पहिल्या फेरीत काही विषयांचे पुस्तके प्राप्त झाली असून शाळा सुरू होण्यापूर्वीपुस्तके शाळेपर्यंत पोहच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विषय प्रमुख वसंत खैरणार यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र कर्मचारी यांच्या मदतीने वाटपाचे नियोजन केले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याचे शिक्षण विभाग निर्गमित करेल. मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मुलांच्या हातात शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके पोहच करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न असून, कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार पुस्तक वाटपाची कार्यवाही करण्यात येईल.- सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी, पेठपहिल्या फेरीत प्राप्त पुस्तकेइयत्ता दुसरी - २६४२, इयत्ता ३री -२९५१, इयत्ता ४ थी - २६५३, इयत्ता ५ वी - २४१७, इयत्ता ६ वी - २४६७, इयत्ता ७ वी - २३५५.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक