दाखल नामांकन अर्जांची आज छाननी

By Admin | Updated: May 8, 2017 00:46 IST2017-05-08T00:45:50+5:302017-05-08T00:46:00+5:30

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी ७८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

Filing of nomination forms today | दाखल नामांकन अर्जांची आज छाननी

दाखल नामांकन अर्जांची आज छाननी


विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी ७८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या नामांकन अर्जांची आज सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये छाननी केली जाणार आहे. सकाळी ११ वाजेला छाननीला प्रारंभ होणार आहे. येत्या ११ मे रोजी माघारीची मुदत आहे. १२ मे रोजी चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे. २४ मे रोजी मतदान होऊन २६ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
शहराच्या पश्चिम भागातील ९, १०, ११, १२, १३ या प्रभागांमध्ये सर्वाधिक नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सोमवारी छाननी केली जाणार आहे. तांत्रिक बाबींमुळे काही अर्ज फेटाळले जाण्याची चिन्हे दिसून येत आहे. अर्ज छाननीनंतर बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना इच्छुकांची मनधरणी करावी लागणार आहे. माघारी नाट्यही घडू शकतात. एकाच प्रभागात अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Web Title: Filing of nomination forms today