कामगार मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 22, 2015 01:40 IST2015-06-22T01:37:14+5:302015-06-22T01:40:16+5:30
कामगार मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल

कामगार मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल
नाशिक : इलेक्ट्रिक पोलवर वायर ओढण्याचे काम सुरू असताना शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ दोंदू भांगरे (३०) या युवकाचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत विविध विकासकामे सुरू आहेत़ पेठरोडवरील तवली फाट्यावर शनिवारी इलेक्ट्रिक पोलवरील वायर ओढण्याचे काम सुरू होते़ हे काम संगमनेर तालुक्यातील राजूर खडकी येथील सोमनाथ दुंदा भांगरे (३०) हा युवक करीत होता़ हे काम सुरू असताना विद्युत पुरवठा बंद ठेवणे आवश्यक होते़ मात्र संबंधित ठेकेदाराने तो बंद ठेवला न ठेवल्याने शॉक लागून भांगरेचा मृत्यू झाला़ या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भांगरेच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)