बोगस आर्किटेक्चरवर गुन्हे दाखल करणार : नीलेश चव्हाण
By Admin | Updated: June 29, 2014 00:41 IST2014-06-29T00:32:23+5:302014-06-29T00:41:49+5:30
बोगस आर्किटेक्चरवर गुन्हे दाखल करणार : नीलेश चव्हाण

बोगस आर्किटेक्चरवर गुन्हे दाखल करणार : नीलेश चव्हाण
नाशिक : आर्किटेक्ट हे शीर्षक वापरण्याच्या कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरच्या निर्देशांची पायमल्ली करीत आर्किटेक्ट नसताना आर्किटेक्ट म्हणून मिरवणाऱ्या समव्यावसायिकाविरुद्ध कौन्सिलकडे तक्रार, तसेच पोलिसांत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली़ शहरात बोगस आर्किटेक्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत सीएनएक्स’मध्ये शुक्रवारी (दि़२७ जून) प्रसिद्ध करण्यात आले होते़ या वृत्ताची दखल घेत असोसिएशनने पावले उचलली आहेत़
चव्हाण पुढे म्हणाले की, वृत्तपत्रांमधील विविध बातम्या, बांधकाम साईटवरील बोर्ड, विक्री ब्रोशर्स, तसेच काही बांधकाम व्यावसायिकांचे नकाशे यावर आर्किटेक्ट नसलेल्या समव्यावसायिकांचा आर्किटेक्ट म्हणून उल्लेख आढळतो़ यावर विचारणा केली असता आमचे अशील परस्पर लिहितात किंवा वृत्तपत्रांनी छापले, असे स्पष्टीकरण दिले जाते़ त्यामुळे शहरात आर्किटेक्ट या शीर्षकाचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात येणार आहे़ आर्किटेक्ट या शीर्षकाचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये काही सिव्हिल इंजिनिअर, इटेरिअर डिझायनर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)